तारीख : 20-11-2021श्रेणी :मनोरंजन
पुणे : लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या धारावी कट्टा या हिंदी चित्रपटाचा मुहुर्त पुण्यात नुकताच संपन्न झाला. अल्ताफ शेख यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या "वेडा बी एफ" या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच गल्ला केला होता.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. या चित्रपटानंतर बेतुका हा हिंदी चित्रपट, कम ऑन विष्णू हा कन्नड चित्रपट आणि आता धारावी कट्टा या चौथ्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या लेखणी वैविध्यपूर्ण आहे. त्यांनी लिहिलेल्या मराठीतल्या पहिल्या कव्वालीची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. आता धारावी कट्टा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, याचे डिजिटल राईट्स प्राईम पिक्चर फाईव्ह या ओटिटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत.
धारावी कट्टाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः अल्ताफ शेख आहेत. या सिनेमाची कथा एका वस्तीमधील चार मुले आपली काहीही चूक नसताना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले जातात. या मुलांना गुन्ह्यात अडकवले गेले आहे, हे एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात येते आणि तो पोलिस अधिकारी या मुलांची यातून सुटका करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी ज्येष्ठ अभिनेते विजय नवले, ज्येष्ठ अभिनेत्री वृंदा बाळ, अभिनेत्री संगीता चवरे, अभिनेता अभिषेक चवरे, सहायक दिग्दर्शक हर्ष राजे, अभिनेत्री आरती पाटील, अभिनेता कुतुबुद्दीन गड्डेकर, अभिनेता नागेश स्वामी, अभिनेता आशिक राजपूत, नृत्य दिग्दर्शक शाहिद राजपूत, कास्टिंग दिग्दर्शक भैरव पवार, अभिनेत्री प्राजक्ता ठिगळे, अभिनेत्री शोभा देशपांडे, अभिनेत्री मुस्कान शेख, अभिनेता सलमान शेख, अभिनेता सतीश कुंभार आदी उपस्थित होते.
धारावी कट्टा या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट प्राईम पिक्चर ५ यांच्याकडे आहे.
तारीख : 14-02-2024श्रेणी :मनोरंजन
टाकवे बुद्रुक (Takwe Budruk) : आंदर मावळ परिसराची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या टाकवे गावची यात्रा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या जल्लोषात होणार असून यंदा श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा देखील वसंत पंचमीच्या मुहूर्तावर संपन्न होणार आहे. त्यानिमित्त तीन दिवस भव्य बैलगाडा शर्यत, कुस्ती आखाड्यासह नेत्रदीपक मनोरंजनाची मेजवानी पंचकृषीतील नागरिकांना अनुभवता येणार आहे.
मावळ तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणात याठिकाणी यात्रा भरते. त्यामुळे पंचक्रोशीतील बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, पैलवान मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावतात. तत्पूर्वी सात दिवस अगोदर अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी मंडळी भेटी देतात. यावेळी संपूर्ण मंदिर पुर्ण परिसरात भक्तिमय वातावरण असते. दरवर्षी यात्रेनिमित्त आलेल्या पाहुण्यांसाठी खास मांसाहाराची मेजवानी घरोघरी असते. यंदा मात्र गावातील मुख्य मंदीरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार असल्याने १४ ते १८ तारखेपर्यंत शुद्ध शाकाहारी जेवणाचा फक्त अस्वाद पाहुण्यांना घेता येणार आहे.
यात्रेतील कार्यक्रमाचे भरगच्च नियोजन
दि. १४ - श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा,
रात्री मनोरंजनसाठी पवळेवाडी भारुड
दि.१५ - भव्य बैलगाडा शर्यत, आर्केस्ट्रा
दि.१६ - भव्य कुस्ती आखाडा, आर्केस्ट्रा
दि.१७ - भव्य बैलगाडा शर्यत
दि.१८ - भव्य बैलगाडा शर्यत
तारीख : 08-11-2023श्रेणी :मनोरंजन
कामशेत (Kamshet) : जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेली कामशेत बाजारपेठ आता अधिकाधिक सक्षम होताना दिसतीये. ही बाजारपेठ मावळ तालुक्यातील पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळ या तीनही विभागाला जोडणाऱ्या केंद्रस्थानी असल्यामुळे इथे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या भागविण्याच्या अनुषंगाने सुरु असलेली दुकाने-विक्रेते यामुळे बाजारपेठेला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मात्र उत्तम प्रतीच्या कापड व्यवसायाची, रास्त दरात लग्न बस्त्याच्या भव्य दालनाची इथे कमतरता भासली. ती भरून काढण्यासाठी गेली १०० वर्ष ग्राहकांची मने जिंकणारे तसेच मावळातील सर्वात मोठे दालन 'गोकुळ कलेक्शन' आता कामशेत शहरात सुरु झाले आहे.
तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे गेली १०० वर्षांपासून अविरत उच्च दर्जाचे कापड ग्राहकांचा विचार करून अतिशय रास्त दरात देणारे गोकुळ कलेक्शन हे एकमेव ठिकाण आहे. लाखो ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल ग्रामीण भागाचा विचार करून कामशेत या केंद्रस्थानी सेवा देण्याचे त्यांनी ठरवले. त्यामध्ये उत्तम कापड दर्जा, वेगवेगळ्या व्हरायटी, जसे की रेडिमेड, लग्नाचा बस्ता, हळदी समारंभ, नवरदेवाचे कपडे, सुटिंग, शर्टींग, टेलरिंग, ब्रायडल, शालू, सिल्कच्या साड्या, नऊवारी, दहावरी, शेरवानी, कुर्ते, पठाणी तसेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व प्रकारची कपडे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
१० हजार स्क्वेअर फुटात सुसज्ज दालन; प्रशस्त पार्किंग
अगदी लोणावळा शहरापासून ते देहूरोड पर्यंत १० हजार स्क्वेअर फुटात उभे असलेले गोकुळ कलेक्शन हे एकमेव दालन आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक विभागानुसार कपडे उपलब्ध आहेत. जसे की, साड्या (त्यातील सर्व प्रकार), मुलींचे ड्रेस, सलवार, कुर्ते, लहान मुलांची कपडे, जीन्स, लग्नाची कपडे अशा वेगवेगळ्या विभागात कपडे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांना सेवा पुरवण्यासाठी महिला कर्मचारी तर पुरुषांना सेवा पुरवण्यासाठी पुरुष कर्मचारी देखील याठिकाणी आहेत. तसेच याठिकाणी आलेल्या ग्राहकाची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नूतन उदघाटन व दिवाळीनिमित भव्य 'लकी ड्रॉ' ऑफर
कामशेत मधील गोकुळ कलेक्शनच्या (शोरूम) या दुसऱ्या शाखेच्या नूतन उदघाटनामुळं व दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी येथे भव्य 'लकी ड्रॉ' ऑफर सुरु करण्यात आली आहे.यामध्ये प्रथम क्रमांकाला वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकाला फ्रिज, तृतीय क्रमांकाला LED स्मार्ट टीव्ही, यासोबतच पॉपअप टोस्टर, सँडविच टोस्टर, मिक्सर आणि इस्त्री इ. आकर्षक बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे. याशिवाय १ हजार रुपयाच्या खरेदीवर हमखास बक्षीस देण्याची हमी त्यांनी दिलीये. ही ऑफर रविवार (दि. ५ नोव्हेंबर) ते सोमवार (दि. २० नोव्हेंबर २०२३) या कालावधीत म्हणजेच तब्बल १५ दिवस सुरु राहणार आहे. तर हा 'लकी ड्रॉ' रविवारी (दि. २६) रोजी सायंकाळी पाच वाजता गोकुळ कलेक्शन, कामशेत याठिकाणी घेण्यात येणार आहे. (Promoted Content)
पत्ता : अजय ढाबा शेजारी, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ,
जुना मुंबई-पुणे महामार्ग, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे
संपर्क : ९१४६७६७५५१
तारीख : 30-10-2023श्रेणी :मनोरंजन
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वडगाव नगरपंचायतच्या नगरसेविका पुनम खंडेराव जाधव, पुजा विशाल वहिले, माया अमर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठान, जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ आयोजित "खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर २०२३" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास वडगाव शहरातील सुमारे १५०० महिला भगिनी इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनिसाठी व्हावेत म्हणून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून नितीन कोकणे प्रस्तुत खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नगरसेविका संगीता शेळके, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, मा.उपसरपंच विशाल वहिले, नगरसेवक मंगेश खैरे, नगरसेविका पूनम जाधव, पुजा वहिले, माया चव्हाण, वैशाली ढोरे, पुनम वायकर, सायली म्हाळसकर, चेतना ढोरे, नुतन ढोरे, कविता नखाते, प्रतिक्षा गट, प्रियंका खैरे, सुषमा जाजू, तुषार वहिले, सौरभ सावले, हेमंत जाधव, अभिजीत ढोरे, आफताब सय्यद, सिद्धी सावले, छाया जाधव, किर्ती वहिले, सुरेखा गुरुव, रुपाली खैरे, सुनीता ढोरे, प्रमिला पोटे, स्नेहल वाघमारे, सुवर्णा वहिले, विजया माळी आणि मोरया महिला प्रतिष्ठान, जय मल्हार ग्रुप व अंबिका ग्रुपच्या महिला संचालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पहिली मानाची पैठणी सीमा सचिन जाधव, दुसरी सोन्याची नथ राजश्री दिपक जाधव, तर तिसरे बक्षीस चांदीचा छल्ला श्रद्धा प्रविण मांडवकर या विजेत्यांनी अनुक्रमे ही बक्षीसे पटकावली. याशिवाय तीन उत्तेजनार्थ विजेत्यांना चांदीची नाणी तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या व स्पर्धेवेळी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमावेळी वडगाव नगरपंचायत नगरसेविका यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच उत्तर प्रदेश सहारानपूर येथे पार पडलेल्या १३ व्या वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कुराश (रशियन) कुस्ती मध्ये पैलवान कु. कुष्णाई प्रशांत वाडकर हिने वरिष्ठ राष्ट्रीय स्तरीय बाँझपदक पटकवल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान वडगाव शहरातील माता भगिनींचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉ देखील घेण्यात आला होता. यात तीन महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी आभार मानले.
तारीख : 29-10-2023श्रेणी :मनोरंजन
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त वडगाव नगरपंचायतीच्या मा. उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी नवरात्रमध्ये नऊ-दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करून दररोज एक सेल्फी व रील्स पाठवणाऱ्या स्पर्धकांसाठी मी दुर्गा बेस्ट सेल्फी अँड रिल्स कॉन्टेस्ट-२०२३ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात शनिवारी (दि. २८) या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
नऊ दिवस असलेल्या या स्पर्धेत एकूण १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये वैष्णवी तांबे, वैशाली शिंदे, माधुरी पचपांडे, ज्योती भवारी, दिपाली मोरे, किरण ढेरे, वर्षां सोमाणी, निकिता मुथा, निकाता वानखेडे यांनी बेस्ट सेल्फी ऑफ डे म्हणून नऊ दिवसातील नऊ दुर्गा बाण्याचा मान मिळवला. बेस्ट रील्स म्हणून अक्षदा शिंदे प्रथम, पुनम गायकवाड द्वितीय, तर ममता दौंडे यांनी तृतीय क्रमांकाचा मान मिळविला.
तर नवदुर्गांपैकी भाग्यशाली महादुर्गा विजेत्या-२०२३ म्हणून निकिता वानखेडे यांची निवड झाली. यावेळी त्यांना सोन्याची नथ, फ्रीज, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व आकर्षक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नऊ दिवसातील नऊ दुर्गा ठरलेल्या विजेत्यांस सोन्याची नथ, भेटवस्तू, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व फेटा घालून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ म्हणून १८ स्पर्धकांना विविध बक्षीसे देण्यात आली.
याप्रसंगी सुषमा तोरस्कर, अश्विनी तुमकर, सुनिता तुमकर, रेणुका दंडेल, पुष्पा सुराणा, सोनाली मोरे, आरती राऊत, आदिती सुळे, अनिता भसे, राजश्री तांबोळी, गीता मोरे, काजल ढोरे, नसीम शेख, स्वाती पाटोळे, सीमा ओव्हाळ, स्नेहा कर्णवट, मालती घारे, अनिता राऊत, पूजा पिंगळे, रेबिका चव्हाण, ज्योती कदम, विदुला भिडे, योगिता बाफना, मनिषा दरेकर, माधवी बोरावके, विनया कडू, अनुपमा आरगे, श्रेया भंडारी, बेबी कडू, सुरेखा खांडभोर, अनिता बाफना, मंदाकिनी वाघमारे, सुनिता जाधव, वैशाली लचके, प्रिया लवंगारे, रेखा भोसले, अश्विनी भोसले, मनिषा ढोरे, सुवर्णा उडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बक्षीस वितरणाचे संयोजन वडगाव मनसेच्या शहराध्यक्ष अर्चना ढोरे, अश्विनी म्हाळसकर, वर्षा म्हाळसकर, सुषमा म्हाळसकर, प्रतीक्षा शिंदे, सोनल कराळे, शीतल म्हाळसकर, सानिया शेख, सीमा वावरे, साक्षी म्हाळसकर, जागृती म्हाळसकर, रेणुका म्हाळसकर, सुवर्णा म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, आदी महिलांनी केले.
तारीख : 29-10-2023श्रेणी :मनोरंजन
वडगाव मावळ (Vadgaon Maval) : वडगाव मावळ येथे श्री विठ्ठल परिवार व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक शंकरराव शेळके आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते नुकतेच दिपप्रज्वलन करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मावळ तालुक्यातील सुमारे दिडशेहून अधिक भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात या भजन स्पर्धेस सुरुवात झाली असून या स्पर्धा सलग तीन दिवस चालू असणार आहेत.
याप्रसंगी शंकरराव शेळके, ह.भ.प. शंकरराव मराठे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, हभप गणेश महाराज जांभळे, ह.भ.प. नितीन काकडे, महेंद्र ढोरे, दिलीप खेंगरे, दत्ता केदारी, नारायण ठाकर, लक्ष्मण सातकर, प्रकाश जाधव, मुकूंद राऊत, बाळू आडकर, बाबाजी बालगुडे, बाळासाहेब जांभूळकर, रुपाली नाणेकर, परिक्षक राधाकृष्ण गरड, गणेश मोहिते, अजित लोहार आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच वारकरी संप्रदायातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपला महाराष्ट्र ही साधु संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्व संतांनी आपल्या अभंगातून समाजाला एक नवी दिशा दिली. हा असा एकोपा, प्रेम, स्वयंशिस्त, भक्तीभाव आपल्याला अशा भजन स्पर्धांमधून पहायला व शिकायला मिळते. असा हा भक्तिमार्गाचा वारसा जतन करण्याचे व तो पुढे नेण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असा विश्वास मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केला.