तारीख : 15-02-2021श्रेणी :खेळ
तारीख : 31-01-2024श्रेणी :खेळ
लोणावळा (Lonavala) : चेन्नई, तामिळनाडू येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने सलग दुसऱ्या वर्षी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. वैष्णवचे पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील हे तिसरे रौप्यपदक आहे.
पुणे जिल्हा व मावळ तालुक्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात ६५ किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली आहे. त्याने ६५ किलो गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत अत्यंत अतितटीच्या लढतीत पंजाबच्या मल्लाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले व दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
वैष्णव याची ही पाचवी राष्ट्रीय स्पर्धा होती. पाच राष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके पटकाविली आहे. गतवर्षी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक तर रांची, झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ६३ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राष्ट्रीय व राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे.
वैष्णव हा शिवली गावातील राष्ट्रीय स्तरावर खेळलेला सहावा राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. यामध्ये त्याचा भाऊ राष्ट्रीय कुस्तीगीर विपुल आडकरचाही समावेश आहे. वैष्णवचे वडील पै. नारायण आडकर व आजोबा स्वर्गीय दशरथ आडकर हे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगीर होते. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.
वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, पै. तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर पै.नागेश राक्षे यांच्यासह मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
तारीख : 28-01-2024श्रेणी :खेळ
पवनानगर (Pawnanagar) : प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) निमित्त पवनानगर परिसरात ओल्ड इज गोल्ड क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पवन मावळ परिसरातील प्रत्येक संघ निवडून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना'पवन मावळ क्रिकेटरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वहिले यांनी यापूर्वी पवन मावळ येथील अनेक लेदर क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. यामध्ये मावळ तालुक्यातील अनेक गावातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला. तसेच त्यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याची संधी मिळाली. आईपीएल पुणे वॉरियर्स या संघासोबत त्यांना सराव करण्याची संधी भेटली. त्याचबरोबर सिंगापूरमध्ये त्यांना साऊथ आफ्रिका (अ) संघासोबत खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे पवन मावळ क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्यांची आजवरची कामगिरी पाहता त्यांना पवन मावळ क्रिकेटरत्न हा पुरस्कार पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, हर्षल छाजेड, अमित कदम, नितीन कालेकर, शंकर कालेकर हस्ते देण्यात आला.
तारीख : 09-01-2024श्रेणी :खेळ
पवनानगर (Pawnanagar) : मावळ तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील वारु गावातील तृप्ती शामराव निंबळे हिने आंतरराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. नेपाळ येथे ही स्पर्धा झाली. तिच्या या कामगिरीमुळे संपूर्ण मावळसह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्याचे नावलौकीक झाले आहे. यासाठी तिला क्रिडा शिक्षक टि.वाय.अत्तर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यापूर्वी तृप्तीने विविध देशामध्ये जाऊन थायबाँक्सिंग सुवर्णपदके मिळवले आहे. २०१८ साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या २०१७ मध्ये तृप्तीने थायबाँक्सिग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकची कमाई केली होती. आसाम येथे याच स्पर्धेत रजतपदक मिळवले आहे. गोवा येथे आंतराष्ट्रीय थायबाँक्सिग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. अशा प्रकारे अनेक स्पर्धांमध्ये तब्बल ६९ पदके मिळविले आहे.
तृप्ती ही उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर येथे शिक्षण पुर्ण केले असून ती आता क्रिडा शिक्षण विभागात नोकरी करत आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे घरातूनच मिळाले. तिचे वडिल हे पुणे जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील मल्लसम्राट शामराव निंबळे अशी ओळख आहे. शामराव निंबळे यांना तीन मुली प्रिती, दुसरी करिष्मा सनी बारणे व तृप्ती आणि आई जिजाबाई गृहिणी आहे. तिचा भाऊ हा कुस्तीक्षेत्रातच होता. सन २०१४ मध्ये त्याचे अपघाती निधन झाले. यावर बोलताना तृप्तीने सांगितले, माझ्या भावाचे व वडिलांचे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खेळले असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मी अनेक पदके भुषीविली. यापुढेही मी देशासाठी खेळतच राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.
यावेळी तृप्तीने सांगितले, महिलांनी क्रिडा क्षेत्रात काम करुन आपल्या भारत देशाचे नाव पुढे घेऊन जावे. क्रिडा क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. परंतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवावी लागते. यामुळे मला आज विविध राज्य व देशभरात खेळता आले. मी यापुढेही देशासाठी खेळत राहणार असून मी माझ्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार आहे. मला यापुढे शासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याची इच्छा आहे. यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे.
तारीख : 22-11-2023श्रेणी :खेळ
लोणावळा (Lonavala) : धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथु घारे व उर्से गावचा राष्ट्रीय पदक विजेत्या संकेत दामू ठाकूर यांनी कांस्यपदक पटकावले आहे. दोघांनी गतवर्षी कोथरूड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा नुकतीच धाराशिव येथे पार पडली. या स्पर्धेत मावळातील संकेत ठाकूर, केतन घारे व अभिषेक हिंगे या तीन मल्लांनी पुणे जिल्हा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावित राज्य अजिंक्यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये केतन नथु घारे याने गादी विभागातील ६५ किलो तर संकेत दामू ठाकूर याने ७० किलो वजनी गटात नेत्रदीपक कुस्त्या करून कांस्यपदक पटकावले आहे. गतवर्षी कोथरूड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दोघांनी आपआपल्या वजनी गटात कांस्यपदक पटकावले होते. संकेत ठाकूर यांचे हे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील हे तिसरे तर केतन घारे याचे हे दुसरे पदक आहे. तसेच संकेत ठाकूर यांने दोन राष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावली आहेत.
विजेत्या मल्लांचे मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे आश्रयदाते व अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष व ऑलंम्पिकवीर कुस्तीगीर पै. मारूती आडकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, अध्यक्ष पै.खंडू वाळूंज, सचिव व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. बंडू येवले, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै. शंकर कंधारे, उपाध्यक्ष व विद्यापीठ चॅम्पियन पै. सचिन घोटकुले, पै. मनोज येवले, सहसचिव व महाराष्ट्र चॅम्पियन पै. पप्पु कालेकर, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर पै. भरत लिमण, निवृत्ती काकडे, नागेश राक्षे, सुरेश आगळमे, धोंडिबा आडकर, बाळासाहेब काकरे, बाळासाहेब वाळूंज, शंकर देशमुख, नारायण आडकर, चंद्रकांत शिंदे, पै. विष्णु शिरसाट, संघाचे सल्लागार पै. राजु बच्चे, पै. देविदास कडू, पै. गजानन राक्षे, गुलाबराव जाधव, नारायण आडकर, नथु घारे, विश्वास वाघोले, नागेश वाडेकर, गोरख लिमण यांनी अभिनंदन केले आहे.
तारीख : 19-11-2023श्रेणी :खेळ
कार्ला (Karla) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषक २०२३ साठी अंतिम सामना होत आहे. तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होत आहे. यावर्षीच्या विश्वचषकात भारताने सलग १० सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिल्याने विश्वचषकापासून भारत केवळ एक पाऊल दूर आहे. आज अंतिम सामना होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत विश्वविजेता होण्यासाठी अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवीला क्रिकेटप्रेमींनी साकडे घातले.
सलग १० सामने जिंकून भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरण्याचे ध्येयच ठरवल्याचे दिसते. अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने खेळी करत सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने घवघवीत यश मिळवले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.
दरम्यान, २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर आज दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार...हे आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. तूर्तास राष्ट्रपेमी भारतवासीयांनी भारत विश्वविजेता होण्याचे स्वप्न रंगविले आहे.