तारीख : 07-05-2021श्रेणी :जग
तारीख : 21-12-2023श्रेणी :जग
पुणे (Pune) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते. (Chhatrapati Shivaji Maharaj's WaghNakhe's Soon in India)
मंत्री मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल.
या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
तारीख : 02-09-2023श्रेणी :जग
प्रजावार्ता : चंद्रानंतर आता सूर्याची बारी आली असून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून भारताच्या सूर्य मोहमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात लोकांनी बरीच गर्दी जमली होती. इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे.
पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार प्रवास
आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल.
चौथ्या टप्प्यात हे यान लॅग्रेंज बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे.
असा करणार सूर्याचा अभ्यास
आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. सूर्य हा एक तारा आहे. त्यामुळे सूर्यावर सतत काही ना काही स्फोट होत असतात. पण या कोणत्याही स्फोटांचा परिणाम या यानावर होणार नाही. सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल. दहा दिवसांपूर्वीच भारताने चंद्रावर इतिहास रचला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
तारीख : 28-08-2023श्रेणी :जग
प्रजावार्ता : चंद्राला नेहमीच शीतल अशी उपमा दिली जाते, पण हा चंद्र वाटतो तितका शीतल नसल्याचे समोर आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर तब्बल ७० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हिंदुस्थानच्या 'चांद्रयान-३' ने चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने फेरफटका मारल्यानंतर विक्रमवरील यंत्रणेने प्राथमिक माहिती पाठवली आहे.
विक्रमच्या चेस्ट (मून सर्फेस थर्मो फिजिकल एक्स्परीमेंट) पेलोड या यंत्रणेच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरातील पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाखालील तापमान किती आहे याचे परीक्षण करण्यात आले. त्याचा आलेख इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक्स (ट्विटर) वरून शेअर केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा आणि तेथील तापमानाचे तसेच मातीचे परीक्षण करणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान, ही प्राथमिक माहिती असून आणखी माहिती आणि परीक्षण विक्रमवरील यंत्रणा लवकरच पाठवेल असे इस्रोने म्हटले आहे.
विक्रम चेस्ट पेलोडवर १० विविध प्रकारचे तापमान मोजणारे सेन्सर लावलेले आहेत. तसेच पेलोडवरील यंत्रणा किंवा उपकरण चंद्राच्या १० सेमी खोलीपर्यंत जाऊन तापमान मोजू शकते. तापमान मोजणारे तसेच मातीचे परीक्षण करणारे पेलोड हे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातील स्पेस फिजिकल लॅबोरेटरीमध्ये तयार करण्यात आलेले आहे. या कामी अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे सहकार्य लाभले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून खोलवर गेल्यास तापमानात घट होत जाते. ८० मिमी अंतर्भागात उणे १० अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरत असल्याचे इस्रोच्या आलेखात दाखवण्यात आले आहे.
तारीख : 08-11-2022श्रेणी :जग
मुंबई : या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आज मंगळवारी (८ नोव्हेंबर २०२२) होणार आहे. भारतात सर्वप्रथम हे चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये दिसणार आहे. आज होणारं चंद्रग्रहण हे २०२२ या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण आहे. ते भारतातही दिसणार आहे.
भारतात संपूर्ण चंद्रग्रहण ८ नोव्हेंबरला होणार आहे. चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, उत्तर अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर या भागात दिसणार आहे. देशाच्या पूर्वेकडील भागात, कोलकाता आणि गुवाहाटीसारख्या शहरांमध्ये, चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा पूर्ण टप्पा सुरू होईल.
कोलकातामध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी २० मिनिटांचा असेल आणि चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी १ तास २७ मिनिटांचा असेल. गुवाहाटीमध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी ३८ मिनिटांचा असेल.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये ग्रहणाचा पूर्ण टप्पा संपल्यानंतर चंद्रोदय होईल आणि त्या वेळी आंशिक ग्रहण होईल. या शहरांमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी अनुक्रमे ५० मिनिटे, १८ मिनिटे, ४० मिनिटे आणि २९ मिनिटे असेल. भारतात पुढील चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल, जे आंशिक चंद्रग्रहण असेल.
चंद्रग्रहणाची वेळ
हे चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार २.३९ मिनिटांनी सुरू होईल. याचा पूर्ण टप्पा ३.४६ मिनिटांनी सुरू होईल ५.१२ मिनिटांनी संपेल. तसेच चंद्रग्रहणाचा आंशिक टप्पा ६.१९ मिनिटांनी संपेल. भारतात या पुढील चंद्रग्रहण २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल आणि ते आंशिक चंद्रग्रहण असेल.
तारीख : 30-03-2022श्रेणी :जग
प्रजावार्ता : युक्रेनचे सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले असून रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढलेला असताना युक्रेनच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहे. अमेरिकेने नाटोच्या सैन्याला युरोप आणि पोलंडच्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात केले आहे. नाटोच्या फौजांनी देखील युक्रेन-पोलंडच्या सीमेवर ताबा घेतला असून रशिया विरोधात मोठे पाऊल उचलले जात आहे.
तसेच रशिया विरोधात थेट युद्धात उडी घेता येत नसली तरी अमेरिकेने मोठी ताकद युक्रेनच्या बाजुने उभी केली आहे. अमेरिकेचे सैन्य युक्रेनच्या सैनिकांना त्यांची खतरनाक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत. बायडेन यांच्या पोलंड दौऱ्यानंतर हे प्रमाण वाढविण्यात आले आहे. युक्रेनचे हजारोंच्या संख्येने सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले आहे. तिथे ते हे प्रशिक्षण घेत आहेत.
अमेरिकडून युक्रेनला ९ हजार जेवलिन, ७ प्रकारची छोटी शस्त्रास्त्रे व २ कोटी बंदुकीच्या गोळ्या
सीएनएनुसार अमेरिका युक्रेनला मोठ्या प्रमाणावर जेवलिन अँटी टँक मिसाईल देत आहे. हे शस्त्र एवढे खतरनाक आहे की रशियन फौजांचे कंबरडेच मोडले आहे. पोलंडमधून ही शस्त्रे युक्रेनला पोहोच करण्यात येत आहेत. अमेरिका युक्रेनला ९ हजार जेवलिन आणि सात प्रकारची छोटी शस्त्रास्त्रे देणार आहे. यामध्ये मशीनगन देखील आहे. याचबरोबर युक्रेनला दोन कोटी बंदुकीच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. ही शस्त्रे अमरिकेने थेट युक्रेन सैन्याच्या हाती सोपविली आहेत.
रशियाकडून केव्हाही अणुबॉम्बचा वापर केला जाण्याची शक्यता, टायगर फोर्स हाय अलर्टवर
युक्रेनच्या हाती आता कमी वेळ उरला आहे. रशिया एकीकडे शांतता चर्चा सुरु ठेवून मिसाईल हल्ले करत आहे. दुसरीकडे केव्हाही अणुबॉम्बचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. रशियात तशा संशयास्पद हालचाली घडू लागल्या आहेत. तशीच वेळ आली तर काय करायचे याची तयारी अमेरिकेने सुरु केली आहे. अमेरिकेनेही टायगर फोर्सला हाय अलर्टवर टाकले आहे. तिसऱ्या महायुद्धाची वेळ येऊ नये यासाठी जगभरातील लाखो लोक प्रार्थना करत आहेत.